उरणच्या कंटेनर यार्डवर आयकर विभागाची धाड, अधिकारी कर्मचारी 32 तास नजरकैदेत

अलकार्गे व स्पीडी वेअर हाऊस या दोन कंटेनर यार्डवर आयकर विभागाने अचानक धाड टाकली. सोमवारी सकाळी कंपनीत दाखल झालेले आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी रात्री उशिरा बाहेर पडले. या कारवाईदरम्यान कंपनीच्या एकाही कर्मचाऱ्याला आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने बाहेर जाऊ दिले नाही. कंटेनर यार्डवरील कर्मचाऱ्यांना तब्बल 32 तास नजरकैदेत ठेवण्यात आले. या धाडीनंतर परिसरातील अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments are closed.