IND A Vs AFG A – वैभवला सूर गवसेना! तडाखेबाज सुरुवात करूनही स्वस्तात माघारी परतला, कारण काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तिरंगी मालिकेतील पाचवा सामना सध्या टीम इंडिया-ए आणि अफगाणिस्तान-ए यांच्यामध्ये खेळला जात आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यावेळीही सर्वांच्या नजरा 15 वर्षीय विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. त्याने सुरुवातही आक्रमक केली. मात्र, अवघ्या 28 चेंडूंमध्ये त्याचा डाव संपुष्टात आला. त्याने 2 षटकार आणि चार चोकार मारत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, फरिद्दूनने त्याला बाद करत तंबुचा रस्ता दाखवला.

प्रथम फलंदाजीला उतरताना सलामीवीर प्रियांश आर्य आणि वैभव सूर्यवंशीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. वैभवनेही सुरुवातीला मोठे फटके मारत गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, 38 धावांवर तो बाद झाला. दुसरीकडे प्रियांश आर्यने धमाकेदार फलंदाजी करत 42 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (30), तिलक वर्मा (59), कुमार कुशाग्र (58) यांनी मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 319 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं.

टीम इंडियाने दिलेल्या 320 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा अर्धा संघ 173 धावांमध्ये तंबुत परतला आहे. यश ठाकूर, अंशुल, निशांत, विपराज आणि अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत सामना टीम इंडियाचे बाजून झुकवला आहे. 31.3 षटकांचा खेळ झाला तेव्हा अफगाणिस्तानने 5 गड्यांच्या मोबदल्यात 198 धावा केल्या आहेत.

दरम्यान, IPL 2026 मध्ये आपल्या फलंदाजीने दिग्गज गोलंदाजांना चोपून काढणाऱ्या वैभव सूर्यवंशीची बॅट तिरंगी मालिकेत अद्याप तळपलेली नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजी संदर्भात आणि कमजोरी संदर्भात उलट-सुलच चर्चांना उधान आलं आहे. वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, ‘शॉर्ट बॉल्स’ खेळताना त्याला अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आणि क्रीडा विश्लेषकांमध्ये रंगताना दिसतीये. कारण मागील सर्व 4 सामन्यांत वैभवला ‘शॉर्ट बॉल्स’चा सामना करताना अडचण आली आहे.

Comments are closed.