भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, कर्णधार गिलचा मोठा निर्णय, नितीश रेड्डीचं पदार्पण, ज
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाइव्ह स्कोअर, पर्थ येथे पहिला एकदिवसीय सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात उतरतील. यावेळी रोहित आणि कोहली हे गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील. तर मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता ही मॅच सुरु होणार आहे.
Comments are closed.