बुमराह, चक्रवर्ती IN, कुलदीप, रिंकू OUT…; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इ
भारत विरुद्ध ऑस 1ला टी20 प्लेइंग इलेव्हन: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-1 ने बाजी मारत मालिका जिंकली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका (Ind vs Aus T20) खेळवण्यात येणार आहे. आजपासून (29 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-20 मालिकेला सुरुवात होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होतील. भारतीय प्रेक्षक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील (Ind vs Aus T20) सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भारतीय भाषांमध्ये पाहू शकतील. तर ऑनलाइन प्रेक्षकांसाठी ही मालिका JioHotstar या प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे.
𝐍𝐞𝐱𝐭 𝐔𝐩 ▶️ 𝐓𝟐𝟎 𝐂𝐡𝐚𝐥𝐥𝐞𝐧𝐠𝐞 ⏳
#TeamIndia 1️⃣ च्या पुढे पूर्ण जोरात प्रशिक्षण #AUSWIN बुधवारी T20I 💪 pic.twitter.com/aPwl1fT90m— BCCI (@BCCI) 27 ऑक्टोबर 2025
भारताची संभाव्य Playing XI-
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
भारतविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- (Australia T20 Squad vs India)
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (सामने 1-3), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (सामने 3-5), टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस (सामने 4-5), नाथन एलिस, जोश हेझलवूड (सामने 1-2), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल (सामने 3-5), मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांम्पा
आजूबाजूला हसू, स्मितहास्य आणि चांगले वातावरण
🎥 चे हे मजेदार BTS चुकवू नका #TeamIndiaच्या पुढे फोटोशूट #AUSWIN T20I मालिका 🥳 pic.twitter.com/9t3o1LSXh4
— BCCI (@BCCI) 27 ऑक्टोबर 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी20 : 29 ऑक्टोबर – मनुका ओव्हल, कॅनबेरा
दुसरा टी20 : 31 ऑक्टोबर – मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न
तिसरा टी20 : 2 नोव्हेंबर – ब्लंडस्टोन अरेना, होबार्ट
चौथा टी20 : 6 नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट
पाचवा टी20 : 8 नोव्हेंबर – ब्रिस्बेन
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.