IND vs AUS : पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना आज, बुधवार, 29 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हा सामना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ही टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 अशी गमावली होती. त्यामुळे, भारतीय संघ कॅनबेरा येथे विजयाने सुरुवात करू इच्छितो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना (IND vs AUS T20) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी टॉस दुपारी 1:15 वाजता होईल. टॉसनंतर अर्धा तासाने दुपारी 1:45 वाजता सामना सुरू होईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील थेट पाहू शकता. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर देखिल प्रसारित केला जाईल.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.

टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ – मिच मार्श (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, ट्रॅव्हिस हेड, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नाथन एलिस, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश हेझलवुड, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झांपा.

टी-20 विश्वविजेता भारत – भारतीय संघ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपवादात्मक कामगिरी करत आहे. भारत सध्या टी-20 विश्वविजेता आहे. टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी रोहित शर्मा कर्णधार होता. आता, सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच टी-20 आशिया कप 2025 जिंकला.

Comments are closed.