IND vs AUS – पहिल्या लढतीआधी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ‘बाद’, कांगारुंना एकामागोमाग पाच धक्के

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात 19 ऑक्टोबरपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मार्नस लाबुशेन याला संघात स्थान देण्यात आले आहे.

हिंदुस्थान विरुद्ध वन डे मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकामागोमाग एक धक्के बसले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ दुखापतींनी ग्रासला असून यामुळे संघाच्या संतुलनावर परिणाम झालाय. ग्रीन आधी पॅट कमिन्स संघातून बाहेर गेला. तसेच मधल्या फळीतील फलंदाज जोस इंग्लिसही पहिल्या दोन लढतींसाठी उपलब्ध नसेल. तर अनुभवी फिरकी गोलंदाज अॅडम झंपाही आणि यष्टीरक्षक अॅलेक्स केरीही पहिल्या लढतीत खेळणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे.ो

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हिंदुस्थानचा संघ तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना पर्थमध्ये 19 ऑक्टोबर रोजी, दुसरा सामना एडलेडमध्ये 23 ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना सिडनीमध्ये 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. वन डे संघाचे नेतृत्व शुभमन गिल, तर टी-20मध्ये हिंदुस्थानचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरेल.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक –

पहिला सामना – 29 ऑक्टोबर, कॅनबरा
दुसरा सामना – 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरा सामना – 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथा सामना – 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवा सामना – 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन

Comments are closed.