दिवाळीत भारत अन् ऑस्ट्रिलिया पुन्हा भिडणार; कधी-कुठे रंगणार सामना?, पाहा A टू Z माहिती
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत दुसरी वनडे : रोहित शर्मा आणि विराट कोहली मार्चमधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर सामना खेळण्यासाठी उतरले, पण दोघेही अपयशी ठरल्याने भारतीय चाहत्यांची अधिक निराशा झाली. हे दोघे मिळून केवळ 22 चेंडूच खेळपट्टीवर टिकू शकले. त्यातच अन्य फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केल्यामुळे भारताला यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 7 गडी राखून सरशी साधताना तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
दुसरा सामना कधी आणि कुठे? (IND vs AUS 2nd ODI Time and Date)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही वनडे मालिका तीन सामन्यांची आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात तीन दिवसांचा विश्रांतीचा कालावधी आहे. दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. हा सामना अॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. स्थानिक वेळेनुसार सामना दुपारी 2 वाजता, तर भारतात सकाळी 9 वाजता सुरू होईल.
अॅडलेडमध्ये भारतीय संघाची कामगिरी
अॅडलेडमध्ये भारताने आतापर्यंत 15 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 9 सामने जिंकले, 5 हरले, आणि एक सामना श्रीलंकेविरुद्ध बरोबरीत सुटला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध इथला विक्रम थोडा कमजोर आहे, भारताने 2 सामने जिंकले असून 4 गमावले आहेत. भारतीय संघाला मालिकेत जिंवत राहण्यासाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. जर ऑस्ट्रेलिया दुसरा सामना जिंकला, तर ती मालिका आपल्या नावावर करेल.
याआधी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत यजमानांनी विजय मिळवला होता. भारताने शेवटचा वेळ 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे मालिका जिंकली होती. त्यामुळे इतिहास पुन्हा घडवायचा असेल, तर उरलेले दोन्ही सामने भारताने जिंकणे गरजेचे आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- कर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
भारतविरुद्ध वनडे मालिकेसाठीचा ऑस्ट्रेलियाचा संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लाबुशेन, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, मिचेल ओवेन, जोश फिलिप (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, झेवियर बार्टलेट, जोश हेझलवुड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.