कुलदीप IN, गंभीरच्या लाडक्याचा पत्ता कट; तिसऱ्या वनडे सामन्यासाठी ‘ही’ असणार टीम इंडियाची Playi


IND vs AUS 3रा ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडिया पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाली. त्यामुळे मालिका जिंकण्याची संधी हुकली असली, तरी आता तिसऱ्या वनडे मध्ये प्रतिष्ठा जपण्याची लढत रंगणार आहे. उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी मालिकेचा शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की कुलदीपला संधी मिळाल्यास संघातून बाहेर कोण जाणार?

कुलदीप यादवला मिळू शकते संधी

पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाला मिडल ओव्हर्समध्ये असा गोलंदाज हवा होता, जो स्वतःच्या जोरावर सामन्याचे पारडे फिरवू शकेल. तीन ऑलराउंडरंसह सजलेला भारतीय गोलंदाजी विभाग प्रभावी ठरला नाही. अॅडलेडच्या विकेटचा विचार करता कुलदीप यादवला संधी मिळण्याची चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. आता सिडनीची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असल्याने कुलदीपला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याने आतापर्यंत 113 वनडे सामन्यांत 4.99 च्या इकॉनॉमी रेटसह 181 फलंदाजांना माघारी पाठवले आहे.

‘हा’ खेळाडू जाऊ शकतो बाहेर

कुलदीप यादवला संघात स्थान मिळाल्यास हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसावे लागू शकते. नितीश रेड्डी हा देखील व्यवस्थापनाच्या चर्चेत असू शकतात, परंतु त्याला बाहेर केल्यास संघाची फलंदाजी सातव्या क्रमांकावरच संपेल. हर्षित राणाने अ‍ॅडलेडमध्ये दोन बळी घेतले होते, मात्र मिडल ओव्हर्समध्ये तो कमजोर दुवा ठरत आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने 8 षटकांत 59 धावा दिल्या, तर पहिल्या वनडेत केवळ 4 षटकांच्या स्पेलमध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या.

या दोन फलंदाजांकडे राहील साऱ्यांचे लक्ष

भारत सध्या मालिकेत 2-0 ने पिछाडीवर आहे आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे फलंदाजांची खराब कामगिरी. शुभमन गिलने दोन्ही सामन्यांमध्ये मिळून फक्त 19 धावा केल्या आहेत, तर विराट कोहली तर अजूनही खातेही उघडू शकलेला नाही. त्यामुळे आता सिडनीत होणाऱ्या निर्णायक सामन्यात या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असून साऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतील.

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा –

Gautam Gambhir on Rohit Sharma Retirement : अ‍ॅडलेडमध्ये रोहित शर्मा शेवटचा सामना खेळला?, गौतम गंभीरचा ‘तो’ VIDEO व्हायरल, नेमकं काय काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.