भारतासमोर मालिकेवर शिक्कामोर्तब करण्याची संधी! दोन्ही संघ मैदानात दाखल, सामना कधी सुरु होणार?

Australia vs India 5th T20I Live Cricket Scorecard Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर असून, मालिकेवर शिक्कामोर्तब करण्याची मोठी संधी तिच्याकडे आहे. टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. मात्र त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली.

Comments are closed.