टॅव्हिस हेडच्या विकेटवर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया व्हायरल, पाहा VIDEO!

Champions Trophy 2025, IND vs AUS; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याच्या पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडच्या रूपात भारताला मोठी विकेट मिळवून दिली. हेड क्रीजवर स्थिरावला आणि फटकेबाजी करत असताना त्याने ही विकेट घेतली. वरुणला न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेत पहिली संधी मिळाली, ज्यात त्याने 5 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले. सेमीफायनलमध्येही त्याने टीम इंडियाला मोठा दिलासा दिला, ट्रॅव्हिस हेडच्या  या विकेटनंतर संपूर्ण स्टेडियम आनंदाने उफाळून आला. हेडच्या विकेटवर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माची प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे. (Anushka Sharma Reaction on Travis head wicket)

कर्णधार रोहितने नववे षटक वरुण चक्रवर्तीला दिले. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 5 विकेट्स घेतल्यामुळे त्याला सेमीफायनलमध्ये संधी मिळाली, जो स्पर्धेतील त्याचा पहिलाच सामना होता. चक्रवर्तीने रोहितला निराश केले नाही.त्याने त्याच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हेडला बाद केले. या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू अगदी वर गेला. शुबमन गिलने चांगला झेल घेतला आणि हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टेडियममध्ये बसलेल्या सर्वांनी या विकेटवर खूप आवाज केला, अनुष्का शर्मानेही उभी राहून टाळ्या वाजवून हा विकेट साजरा केला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने कपूर कॉनोलीला यष्टीरक्षकाकडून झेलबाद केले. याआधी, शमीने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडला होता. सुरुवातीला हेडने सावधपणे फलंदाजी केली पण नंतर तो त्याच्या स्फोटक शैलीत आला. हेडने 33 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले.

हेही वाचा-

किंग कोहलीचा हटके अंदाज, ट्रेविस हेड बाद होताच केला मैदानावर भंगडा डान्स
IND vs AUS: विराटने रचला इतिहास! राहुल द्रविडचा विक्रम मोडून पहिल्या स्थानी झेप
मोहम्मद रिजवानचा पत्ता कट, पाकिस्तानच्या कर्णधारपदी सलमान आगाची नियुक्ती

Comments are closed.