IND vs AUS; स्टीव्ह स्मिथचे बॅक टू बॅक शतक, भारताविरुद्ध रचला हा भीमपराक्रम

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग दुसरे शतक झळकावले आहे. यासोबतच त्याने भारताविरुद्ध एक अप्रतिम विक्रमही केला आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 11 शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने इंग्लंडचा फलंदाज जो रूटला मागे टाकला आहे. ही आकडेवारी पाहता स्टीव्ह स्मिथला भारताविरुद्ध खेळणे आवडते. असे स्पष्टपणे म्हणता येईल. I

बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने आपले शतक पूर्ण केले. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात स्मिथने 167 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने कसोटी क्रिकेटमधील आपले 34 वे शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 62च्या आसपास होता. या मालिकेतील त्याचे हे सलग दुसरे शतक आहे. ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने शतक झळकावले.

जो रूटने आतापर्यंत भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली होती. जो रूटने भारताविरुद्ध 10 शतके झळकावली होती. परंतु स्मिथने आता या बहु-दिवसीय फॉरमॅटमध्ये टीम इंडियाविरुद्ध 11 शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंग, गॅरी सोबर्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांनी भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 8 शतके झळकावली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, घरच्या मैदानावर खेळताना स्टीव्ह स्मिथने मागील 10 पहिल्या डावात भारताविरुद्ध 7 शतके झळकावली आहेत.

भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके

11 – स्टीव्ह स्मिथ
10 – जो रूट
08 – रिकी पाँटिंग
08 – गॅरी सोबर्स
08 – व्हिव्ह रिचर्ड्स

एवढेच नाही तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकेही आता स्टीव्ह स्मिथच्या नावावर नोंदली गेली आहेत. त्याने या बाबतीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. स्मिथने आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध 10 शतके झळकावली आहेत. तर विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या मालिकेत प्रत्येकी केवळ 9 शतके झळकावू शकले आहेत.

हेही वाचा-

जिमी अँडरसनने निवडली त्याची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, संघात 4 भारतीयांचा समावेश
स्टेडियममध्ये प्रपोज करून किस केलं, लाईव्ह मॅचदरम्यान जोडप्याचा रोमान्स व्हायरल; VIDEO पाहा
“त्यांच्याशी हसून बोलू नको”, स्टंप माइकवर कोहलीचा सिराजला सल्ला, VIDEO व्हायरल

Comments are closed.