भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका मोबाईल, टीव्हीवर कुठं पाहणार? जाणून घ्या अपडेटस


कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia T20 Series) यांच्यातील 5 सामन्यांची टी 20 मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारत वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे खेळवला जाणार आहे. भारतानं 2023 पासून खेळलेली प्रत्येक टी 20 मालिका जिंकली आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करुन सूर्यकुमार यादवच्या संघानं विजेतेपद मिळवलं. आता ऑस्ट्रेलियातील टी 20 मालिका जिंकण्याचं आव्हान भारतीय संघापुढं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी 20  मालिकेचं थेट प्रक्षेपण कुठं होणार आहे जाणून घेणं गरजेचं आहे.

IND vs AUS Live Streaming T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामना 29 ऑक्टोबरला कॅनबेरामध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार टी 20 मॅच दुपारी 1.45 वाजता सुरु होईल.

जर तुम्हाला टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट पाहायचं असेल तर स्टार स्पोर्टस नेटवर्कच्या स्टार स्पोर्टस हिंदीवर पाहायला मिळे. मोबाईल किंवा अंड्रॉईड टीव्हीवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायचं असेल तर जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाईटवर पाहायला मिळेल.

भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक

भारत आणि ऑस्ट्रेलिया  यांच्यातील पहिली टी 20 मॅच 29 ऑक्टोबरला कॅनबेरा येथे होणार आहे. दुसरी टी 20 मॅच 31 ऑक्टोबरला मेलबर्नला, 2 नोव्हेंबरला तिसरी टी 20  होबार्टमध्ये खेळवली जाईल. चौथी टी 20 मॅच 6 नोव्हेंबरला गोल्ड कोस्टला होईल. तर शेवटची म्हणजेच पाचवी टी 20 मॅच ब्रिसबेनमध्ये होणार आहे.

टी 20 कोण वरचढ, भारत की ऑस्ट्रेलिया?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 32 टी 20 मॅच झाल्या आहेत. यामध्ये भारतानं  20 वेळा विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियानं 11 वेळा विजय मिळवला आहे. तर, एका मॅचचा निकाल लागू शकलेला नाही.

भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर

ऑस्ट्रेलियाचा संघ : मिशेल मार्श (कर्णदार), शॉन एबॉट (मॅच 1-3), जेवियर बार्टलेट, महली बियर्डमॅन (मॅच 3-5), टीम डेविड, बेन ड्वार्शुइस (मॅच 4-5), नाथन एलिस, जोश हेजलवुड (मॅच 1-2), ग्लेन मॅक्सवेल (मॅच 3-5), ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.