IND vs AUS: सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीचा भीमपराक्रम , 3 विकेट्स घेत अक्रम-हरभजनला मागे टाकले!

(IND vs AUS) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शानदार कामगिरी केली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर त्याने 10 षटकांच्या स्पेलमध्ये 48 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. त्याने कूपर कॉनोली (0), कर्णधार स्टीव्ह स्मिथ (73) आणि नॅथन एलिस (10) यांचे बळी घेतले. सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात संघ 49.3 षटकांत सर्वबाद 264 धावांवर बाद झाला. शमीने तीन विकेट घेत एक विक्रम रचला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांचा विक्रम मोडला आहे. (Mohammed Shami Record in ICC tournament)

आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर सध्या 63 विकेट्स आहेत. त्याने 62 विकेट्स घेणाऱ्या अक्रमला सातव्या स्थानावर ढकलले. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत 60+ विकेट्स घेणारा शमी हा एकमेव भारतीय आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (92) आणि श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (92) संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. त्याच्यानंतर श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (81), ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क (72) आणि श्रीलंकेचा माजी गोलंदाज चामिंडा वास (67) यांचा क्रमांक लागतो.

याशिवाय, शमीने आयसीसी एकदिवसीय नॉकआउट सामन्यांमध्ये भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा पराक्रम केला आहे. त्याने पाच एकदिवसीय नॉकआउट डावांमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भज्जीने 8 डावात 11 विकेट्स घेतल्या. आयसीसी एकदिवसीय बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम झहीर खानच्या नावावर आहे. माजी वेगवान गोलंदाज झहीरने 11 डावात 17 बळी घेतले. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (14 डावात 15 बळी) दुसऱ्या स्थानावर आहे. माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. दोघांनीही 10-10 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा-

भारताची धावांचा पाठलाग करताना धोकादायक आकडेवारी, आयसीसी वनडेमध्ये मोठी चिंता!
IND vs AUS: स्मिथ-कॅरीचे अर्धशतक! कांगारूंचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान
कोहलीसाठी स्टेडियममध्ये फॅन्सची गर्दी, विराटसाठी काय म्हणाले चाहते?

Comments are closed.