IND vs AUS T20 Series – जसप्रीत बुमराह विक्रमी शतक ठोकणार? ठरेल हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज

टीम इंडियाच्या वेगवान माऱ्याचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून (29 ऑक्टोबर) पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरुवात होणार आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह चार विकेट घेताच एक जागतिक विक्रम आपल्या नावावर करणार आहे. तसेच अशी कामगिरी करणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज ठरणार आहे.

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत आपल्या वनडे क्रिकेट कारकिर्दीमध्ये 149 आणि कसोटीमध्ये 226 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 96 विकेट आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत चार विकेट घेताच त्याच्या टी-20सह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 विकेट पूर्ण होतील. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच गोलंदाज ठरणार आहे. तर जगातला पाचवा गोलंदाज ठरेल.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कमीत कमी 100 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साउदी, बांगलादेशचा शाकिब अल हसन आणि पाकिस्तानचा शाहीन शाह अफरीदी या गोलंदाजांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह चार विकेट घेताच त्याचा या खेळाडूंच्या यादीमध्ये समावेश केला जाईल. आता जसप्रीत बुमराह हा भीम पराक्रमक पहिल्यात सामन्यात करतो का? हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना 29 ऑक्टोबर, दुसरा सामना 31 ऑक्टोबर, तिसरा सामना 2 नोव्हेंबर, चौथा सामना 6 नोव्हेंबर आणि पाचवा सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. सर्व सामने हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 1.45 सा सुरू होणार आहेत.

टी-20 सामन्यासाठी हिंदुस्थानचा संघ

सूर्य कुमार यादव, शुभमन गिल, टिळक वर्मा, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वोचिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू समसान (यशस्वी) रक्षा), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

Comments are closed.