भारताला मोठा दिलासा, आक्रमक ट्रॅविस हेड टी 20 मालिकेतून बाहेर, आश्चर्यजनक कारण समोर


ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिका सध्या बरोबरीत आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला आहे. तर, पावसामुळं पहिली टी 20 मॅच रद्द झाली होती. भारताविरुद्धच्या दोन्ही टी 20 मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडनं मोठा निर्णय घेतला आहे.  चौथ्या आणि पाचव्या टी 20 सामन्यातून ट्रेविस हेडनं माघार घेतली आहे. भारतीय टीमसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

Travis Head :ट्रॅविस हेड टी 20 मालिकेतून कशामुळं बाहेर?

ट्रॅविस हेडला भारताविरूद्धच्या वनडे मालिकेत आणि टी 20 मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अॅशेस मालिका सुरु होणार आहे. त्या मालिकेची पूर्वतयारी  करण्यासाठी ट्रॅविस हेडनं टी 20 मालिकेतून माघार घेतली आहे. आता तो ऑस्ट्रेलियात शेफील्ड शील्ड  टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ट्रेविस हेड 10 नोव्हेंबरपासून टास्मानिया विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.

ऑस्ट्रेलिया डॉट कॉम डॉट एयू अनुसार ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीनं शेफील शील्ड स्पर्धेत किंवा भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय ट्रॅविस हेडवर सोपवला होता. मात्र, ट्रॅविस हेडनं टी 20 मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला. याचा ट्रॅविस हेडला खराब कामगिरीमुळं संघातून बाहेर काढण्यात आलं नसून त्यानं कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी टी 20 तून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. त्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं फलंदाजी केली नव्हती. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी  20 मॅचमध्ये ट्रॅविस हेड अपयशी ठरला. दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये ट्रॅविस हेडनं 15 बॉलमध्ये  28 धावा केल्या. त्या खेळीत त्यानं 3 चौकार आणि एक षटकार मारला. तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये ट्रेविस हेड6 धावा करुन बाद झाला. हेडनं आता चौथ्या आणि पाचव्या टी  20 मॅचमधून माघार घेतली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टी 20 मॅच  6 नोव्हेंबरला तर पाचवी टी 20 मॅच 8 नोव्हेंबरला होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकणारा संघ मालिका जिंकू शकतो. ऑस्ट्रेलियानं दुसरा सामना जिंकला होता तर तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये भारतानं विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारताला विजय मिळवायचा असेल तर उर्वरित दोन मॅच जिंकाव्या लागतील.  वनडे मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताकडे आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.