IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात रविवारपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पहिला सामना पर्थच्या ऑप्टस मैदानावर सुरू आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्यांदा मैदानात उतरल्याने त्यांच्या कामगिरीवर लक्ष्य होते. मात्र दोघेही पहिल्या लढतीत फ्लॉप ठरले. विराट कोहली भोपळाही फोडू शकला नाही, तर रोहित शर्मा आठ धावांवर बाद झाला.
पर्थ येथे पावसाला आणखी विलंब झाला आहे.#AUSWIN pic.twitter.com/0oTwbZggpe
— BCCI (@BCCI) 19 ऑक्टोबर 2025
Comments are closed.