IND vs AUS: विराट कोहलीचा फॉर्म परत येणार का? चाहत्यांच्या नजरा सिडनीकडे!
सलग दोन सामन्यांत अपयशी ठरलेला विराट कोहली सध्या स्वतःशीच एक अदृश्य लढाई लढत आहे. त्याच्या डोळ्यांत अजूनही तीच जिद्द आहे, पण मनात अनेक विचारांची गर्दी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्याच्याकडून एकेकाळी चौकारांचा पाऊस पडायचा, तोच बॅट सध्या शांत आहे. आणि फक्त काही तासांवर सिडनीत होणारा तिसरा व अखेरचा सामना उभा आहे. जो कदाचित विराटच्या ऑस्ट्रेलियातील कारकिर्दीचा शेवटचा सामना ठरू शकतो.
फॅन्सना मात्र भीती आहे की, हा सामना कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचाच शेवट ठरणार नाही ना? कारण परिस्थिती अशी आहे की, विराट आधीच कसोटी आणि टी-20 स्वरूपातून संन्यास घेतला आहे, आणि आता चर्चेला उधाण आलंय की येणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याची जागा निश्चित नाही.
कोहली ही यंत्र नाही, तोही एक माणूस आहे. जेव्हा धावा येत नाहीत, आत्मविश्वास ढासळतोच. पण विराटची ओळखच आहे. तो संकटात अधिक मजबूत होतो. सचिन तेंडुलकरनंतर जर कोण भारतीय फलंदाज पाकिस्तानविरुद्ध बॅटिंग करताना चाहत्यांना रोमांचित करतो, तर तो विराटच आहे.
पर्थ आणि अॅडलेडमध्ये सलग दोन वेळा शून्यावर बाद झालेला विराट आता सिडनीत आपला आकडा ‘0’ वरून ‘100’ च्या दिशेने नेण्याची आतुरता बाळगून आहे. त्याच्यासाठी हा सामना फक्त रन करण्याची संधी नाही, तर स्वतःशी चाललेल्या मानसिक लढाईत विजय मिळवण्याचीदेखील वेळ आहे. सिडनीत कोहलीची बॅट पुन्हा ‘बोलते’ का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.