IND vs AUS: 5व्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? जाणून घ्या सविस्तर

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (T20 series IND vs AUS) टी20 मालिकेचा 5 वा आणि अंतिम सामना शनिवार, 8 नोव्हेंबरला गाबा मैदानावर होणार आहे. चौथ्या टी20 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

आता पाचव्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिका आपला नावावर नोंदवू इच्छितो. तर ऑस्ट्रेलियन संघ शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. त्यामुळे हा सामना अत्यंत रोमांचक होण्याची शक्यता आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन सोबत मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेल.

सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मध्ये काही बदल होणार आहेत का? टीम इंडियाने मागील सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीतच उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला होता. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल करू इच्छित नाहीत.

म्हणजेच पाचव्या टी20 मध्ये भारतीय संघ त्या विजयी संघासोबत मैदानात उतरेल आणि संघात बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. भारताने सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत मालिकेवर ताबा मिळवला आहे आणि आता गाबा मैदानावर विजय मिळवून 3-1 अशी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न करेल.

Comments are closed.