ब्युटी क्वीन हर्लिन देओचा धमाका, कांगारुंना धू-धू-धुतलं, चौकार-षटकारांचा पाऊस; ऑस्ट्रेलियाविरुद

भारत महिला वि ऑस्ट्रेलिया महिला, 1 एकदिवसीय महिला: भारतीय महिला संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 गडी गमावून 281 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी प्रतिका रावल (64), स्मृती मानधना (58) आणि हर्लिन देओल (54) यांनी अर्धशतके ठोकली. उपकर्णधार स्मृती आणि प्रतिकाने पहिल्या विकेटसाठी 114 धावांची भक्कम भागीदारी केली. मात्र, या सामन्यात आपल्या तडाखेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली ती हर्लिन देओलने.

हर्लिन देओलची झंझावाती खेळी

कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या 150व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाने दमदार सुरुवात करून दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हर्लिन देओलने आक्रमक फलंदाजीचा धडाका लावत केवळ 57 चेंडूत 54 धावा केल्या. तिच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. संपूर्ण डावात हरलीनने एक क्षणही बचावात्मक खेळ न करता सतत गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

विश्वचषकापूर्वी मिळालेली लय

हर्लिन देओलच्या या अर्धशतकाने तिचा उत्तम फॉर्म सिद्ध झाला आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी ही लय टीम इंडियासाठी मोठा फायदा ठरू शकते. तिसऱ्या क्रमांक तिची झंझावाती फलंदाजी प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही.

भारताचा डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 50 षटकांत 7 बाद 281 धावा केल्या. हर्लिन देओलच्या चमकदार अर्धशतकासह स्मृती मंधानाने 58 धावा तर प्रतिका रावलने ओपनिंग करताना 64 धावा ठोकत आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली.

हे ही वाचा –

India vs Pakistan Asia Cup 2025 Match : ‘भारत-पाक मॅच नको, ते सुधारणार नाहीत…’ पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारलेल्या वडिलांसाठी मुलाची आर्त साद

आणखी वाचा

Comments are closed.