क्रिकेटनामा – विश्वचषकाची तयारी अशी?
>>संजय कऱ्हाडे
महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाच्या झालेल्या पराभवाचा वचपा काल मिचेल मार्शच्या संघाने काढला. हिंदुस्थानी संघाची सारी हेकडीच त्यांनी पार तार-तार केली असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही.
हेझलवूड आणि कंपनीने आपल्या फलंदाजांना जे काही पाणी पाजलं ते पाहून ‘आगौ’च्या तोंडचं पाणी पळालं असेल! ‘आगौ’ म्हणजे (आगरकर-गौतमची जोडी).
‘आगौ’ गेला बराच काळ दोन वर्षांनंतर होणाऱ्या वन डे विश्वकप स्पर्धेचा संघ बांधण्याच्या अनुषंगाने बरीच चर्चाही करत आले आहेत. ‘रो-को’ची वन डे संघामध्ये जागा असणार की नाही यावर गपशप करताना ऐपू येत आहेत. रोचा तर वन डे कप्तानपदावरून पत्ताच कापून टाकला! पण त्याच्या आधी चारच महिन्यानंतर होणाऱ्या टी-ट्वेंटी विश्व कप स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघ तयार आहे की नाही याचं उत्तर ‘आगौ’ने द्यायला हवं. हेझलवूडची सलग चार षटपं निभावून नेण्याची ‘आगौ’ने निवडलेल्या फलंदाजांची औकात दिसत नाही!
अभिषेकने 37 चेंडूंत 68 धावा केल्या. काwतुक! पण बाकीचे हिरे चमकायचं का विसरलेत? शुभमन, कप्तान सूर्या, तिलक इत्यादी काय करताहेत! आणि ‘आगौ’ने संजू सॅमसनचं काय करायचं ठरवलंय? त्याची शिफ्ट नेमकी पुठली? फर्स्ट, सेपंड की थर्ड शिफ्ट! रोज शिफ्ट बदलत ठेवलीत तर खात्री बाळगा, प्रत्येक शिफ्टमध्ये तो जांभयाच देईल! त्यानंतर त्याला पुठे निजावणार? शरशय्येवर की बोर्डाच्या जिन्याखाली!
बरं, ‘आगौ’ मला सांगा, तुम्ही राणाजींना कपिल देव बनवण्याच्या प्रयत्नात आहात का? असाल तर माझं ऐका, ते शक्य नाही. कारणं दोन. एक म्हणजे, कपिलपाजी देवाचं देणं घेऊन आले आहेत. तसा दुसरा पुन्हा होणे नाही. दुसरं म्हणजे नवज्योत सिद्धूची वदंता! काही वर्षांपूर्वी एका पत्रकार परिषदेत पाजीना विचारलं गेलं, दुसरा कपिल का तयार होऊ शकत नाही? तर म्हणे, पाजी म्हणाले, ‘क्यूँ की, अब मेरे माँ-पिताजी की उमर हो गयी हैं…’
थोडक्यात, टी-ट्वेंटी संघातले थोडे नव्हे, चार-पाच फलंदाज अधर दिसत आहेत; परदेशी खेळपट्टय़ांचा अभ्यास करण्याची त्यांची तयारी नाही; बुमरा सोडला तर राणाजींची शाश्वती नाही, शिवम दुबेकडे वेग नाही; अक्षर, वरुण आणि पुलदीपला धावांचं आश्वासन नाही… मग, चार महिन्यानंतरच्या टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी तुमची काय तयारी?
‘आगौ’, कालची कामगिरी म्हणजे निव्वळ ‘अपवाद’ किंवा चालताना अचानक लागलेली ‘ठेच’ किंवा अतिखादाडीची ‘उचकी’ असं तुम्ही म्हणत असाल तर अजून बाकी राहिलेल्या तीन सामन्यांकडे आमचं लक्ष आहेच!
Comments are closed.