गिल-पंतने मैदान गाजवलं, पण आता दुसऱ्या दिवशी हवामानाची धास्ती, लीड्सवर पावसाचं सावट, जाणून घ्या

England vs India 1st Test Day 2 live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (20 जून)पासून लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर सुरू झाला आहे. शनिवारी (21 जून) या सामन्याचा दुसरा दिवस आहे. तेंडुलकर-आँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करत 2 गडी गमावून 359 धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिल 127* आणि ऋषभ पंत 65* धावांवर नाबाद आहेत.

पहिल्या दिवसाची हायलाईट्स :

  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
  • यशस्वी जैस्वाल आणि के.एल. राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली आणि भारताला सॉलिड सुरुवात करून दिली.
  • लंचपूर्वी राहुल 42 धावांवर बाद झाला, तर पदार्पण करणारा साई सुदर्शन खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
  • त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलने दुसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली.
  • इंग्लंडकडून एकूण 5 गोलंदाज वापरण्यात आले.
  • शोएब बशीर हा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. त्याने 3.10 च्या इकॉनॉमीने मोजकेच धावा दिल्या.
  • कर्णधार बेन स्टोक्सने 2 बळी घेतले, तर ब्रायडन कार्सला 1 विकेट मिळाली.
  • पहिल्या दिवसावर भारताने आपली मोहोर उमटवली असून दुसऱ्या दिवशी गिल-पंत जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Comments are closed.