IND Vs ENG 1st Test – IPL मध्ये फ्लॉप शो, इंग्लंडमध्ये हिरो! ऋषभ पंतने शतक ठोकत मोडला धोनीचा विक्रम

इंग्लंडमधील लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी IPL मध्ये फ्लॉप ठरलेल्या ऋषभ पंतने आपली शतकीय खेळी पूर्ण करत महेंद्र सिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंतने यांच्या भागीमुळे संघाने 400 चा आकडा पार केला.

ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले आहे. याबाबतीत त्याने महेंद्र सिंग धोनीला मागे टाकले आहे. ऋषभ पंत आता सर्वाधिक शतक ठोकणारा हिंदुस्थानी यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. महेंद्र सिंग धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीत सहा शतके ठोकली आहेत. सध्या टीम इंडियाची फलंदाजी सुरू असून ऋषभ पंत नाबात 133 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 451 धावांपर्यंत मजल मारली आहे.

Comments are closed.