भारताचा विजय 7 पावलांवर, मोहम्मद सिराज- आकाशदीप यांच्यावर मोठी जबाबदारी, इंग्लंड मॅच वाचवणार?

बर्मिंघम : दुसऱ्या कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस आज आहे. या दिवशी भारताला विजयासाठी 7 विकेटची गरज आहे. तर, इंग्लंडला विजयासाठी 536 धावांची गरज आहे.  इंग्लंडला विजय मिळवायचा असल्यास त्यांना 90 ओव्हरमध्ये या धावा कराव्या लागतील. भारतानं चौथ्या दिवसाच्या तीन सत्रात वर्चस्व गाजवलं. इंग्लंड 3 बाद 72 पासून पुढे फलंदाजीला सुरुवात करेल. त्यांना मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा यांच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल. 

Comments are closed.