IND vs ENG: 3 खेळाडूंची होणार एंट्री! ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील द ओव्हल स्टेडियमवर 31 जुलैपासून खेळवला जाणार आहे. हा सामना मालिकेचा निर्णायक ठरू शकतो. इंग्लंडची टीम हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय संघ ओव्हल टेस्ट जिंकून मालिकेला 2-2 अशी बरोबरी मिळवू इच्छितो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार? कारण विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत पाचव्या टेस्टमधून बाहेर असण्याची शक्यता आहे. तसेच जसप्रीत बुमराहनेही मालिकेतील तीन सामने खेळून पूर्ण केले आहेत. आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या मालिकेसाठी कुलदीप यादवला टीम इंडियामध्ये तर सामील करण्यात आलं आहे, पण अद्याप त्याला एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही सतत प्रश्न विचारले जात आहेत. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की ओव्हल टेस्टमध्ये कुलदीप यादव खेळताना दिसू शकतो. याशिवाय आकाश दीपचीही पाचव्या टेस्टमध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तसेच अर्शदीप सिंग ओव्हल टेस्टमध्ये आपला पदार्पणाचा सामना खेळताना दिसू शकतो.
मालिकेचा चौथा टेस्ट सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात आला होता. हा सामना जरी अनिर्णीत राहिला असला, तरीदेखील या ड्रॉला एका अर्थाने टीम इंडियाची विजयासमान कामगिरी मानली जात आहे. कारण एका टप्प्यावर इंग्लंडने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले होते आणि भारताचा पराभव निश्चित मानला जात होता.
मात्र दुसऱ्या डावात कर्णधार शुबमन गिल, केएल. राहुल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे इंग्लंडला घायाळ होऊन सामना ड्रॉ करावा लागला. दुसऱ्या डावात गिल, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतके ठोकली. सध्या टीम इंडिया ही मालिका 1-2 ने पिछाडीवर आहे.
Comments are closed.