उपकर्णधार जखमी असतानाही फलंदाजी करणार, पाचव्या दिवसाचे पहिले सत्र ठरणार निर्णायक

इंडिया वि इंग्लंड डे 5 थेट नवीनतम अद्यतनेः मँचेस्टर कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. भारताला पराभव टाळायचा असेल, तर शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सध्या सर्वांची आशा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के.एल. राहुलवर टिकून आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 174 धावा केल्या आहेत, पण अजूनही ते इंग्लंडच्या 137 धावांनी पिछाडीवर आहेत.

पहिले सत्र ठरणार निर्णायक

पाचव्या दिवसाचे पहिले सत्र भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर गिल आणि राहुल हे दोघे सत्रभर खेळत राहिले, तर भारतासाठी सामना वाचवणं सोपं होईल आणि सामना ड्रॉ होण्याची शक्यता वाढेल. पण जर भारत पराभूत झाला, तर ही मालिका देखील गमावावी लागेल.

पावसाची शक्यता आणि स्टोक्सची अनुपस्थिती

सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यामुळे भारताला दिलासा मिळू शकतो. तसेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे शेवटच्या दिवशी गोलंदाजी करु शकणार नाही, अशी शक्यता आहे. स्टोक्सने पहिल्या डावात 5 विकेट घेतले होते आणि या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत.

उपकर्णधार जखमी असतानाही फलंदाजीसाठी तयार

या दरम्यान, भारताचा उपकर्णधार जरी जखमी असला तरी गरज भासल्यास तो फलंदाजीस उतरेल, अशी माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Comments are closed.