IND Vs ENG 4th Test – रविंद्र जडेजा-वॉशिंग्टनची झुंजार खेळी; इंग्लंडला अक्षरश: रडवलं, मँचेस्टर कसोटी अनिर्णित

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलल्या मँचेस्टर कसोटीमध्ये रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने धमाकेदार प्रदर्शन केलं आहे. या दोघांनी मिळून केलेल्या झुंजार भागीमुळे चौथी कसोटी अनिर्णित सुटली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा करत 331 धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली होती. परंतु कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी 188 धावांची भागी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर सुत्र हाती घेतली ती रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने.
शुभमन गिल (103) आणि केएल राहुल (90) बाद झाल्यानंतर संघाची पडझड सुरू होते का, अस प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला असावा. परंतु चाहत्यांसह इंग्लंडलाही आपल्या फलंदाजीने जबर धप्पा दिला तो जडेजा आणि सुंदर या जोडीने. दोघांनी संयमी फलंदाजी करत शतके ठोकली आणि सामना सुद्धा हातातून जाऊ दिला नाही. रविंद्र जडेजाने नाबाद 185 चेंडूंचा सामना करत 107 धावांची खेळी केली. यामध्ये 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याला वॉशिंग्टन सुंदरने नावाप्रमाणेच सुंदर साथ दिली. त्यानेही 206 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकार आणि एक षटकार मारत 101 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे दिवसा अखेर टीम इंडियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 425 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. आता पाचवी कसोटी टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे. पाचवी कसोटी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहे.
Comments are closed.