वेळेआधी सामना ड्रॉ करण्यासाठी स्टोक्स जडेजाच्या हातापाया का पडत होता?; अखेर स्वत:चं सांगितलं का

Ind vs ENG चौथी चाचणी: भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.  शुभमन गिल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरच्या शतकांच्या जोरावर भारतानं इंग्लंडविरुद्धची (Ind Vs Eng 4th Test) चौथी कसोटी वाचवली. दरम्यान या सामन्यात पाचवा दिवसाचा खेळ संपण्याआधी मैदानात एक ड्रामा पाहायला मिळाला.

सामना संपण्याआधीच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) टीम इंडियासमोर मॅच लवकर ड्रॉ करण्याची ऑफर दिली. मात्र बेन स्टोक्सची ही ऑफर टीम इंडियाने फेटाळून लावली. रवींद्र जडेजा 89 तर वॉशिंग्टन सुंदर 80 धावांवर फलंदाजी करत असताना बेन स्टोक्स सामना ड्रॉ करण्यासाठी पुढे आला. स्टोक्सने मॅच ड्रॉ करण्याची ऑफर दिल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रुममधून स्पष्टपणे नकार दिला.

बेन स्टोक्सला सामना लवकर ड्रॉ का करायचा होता?

सामना संपल्यानंतर टीम इंडियाला दिलेल्या ड्रॉच्या ऑफरवर बेन स्टोक्सला विचारण्यात आले. यावर भारताने कठोर परिश्रम केले आणि दबावाला तोंड दिले, जडेजा आणि सुंदर दोघांनीही कठोर मेहनत घेतली होती आणि त्यांना त्यांचे शतक पूर्ण करायचे होते. मात्र मालिकेतील अजून एक सामना शिल्लक असताना मला माझ्या वेगवान गोलंदाजांबाबत धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे मी वेळआधी सामना ड्रॉ करण्याची ऑफर दिली होती, असं बेन स्टोक्सने सांगितले.

जडेजा अन् सुंदरने ऑफर नाकारताच स्टोक्स संतापला-

सामना ड्रॉ करण्याची बेन स्टोक्सची ऑफर जडेजा अन् सुंदरने नाकारल्यानंतर बेन स्टोक्ससह इंग्लंडचे अनेक खेळाडू संतापल्याचे दिसून आले. यावेळी मैदानात चांगलाच ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदरसोबत हात मिळवला नाही. सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स याच मुद्द्यावरुन भांडत राहिल्याचं समोर आलं.

संबंधित बातमी:

Ind Vs Eng 4th Test: सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स भांडत राहिला; जडेजा अन् सुंदरसोबत काय केलं?, मैदानात ड्रामा, VIDEO

Ind vs Eng 4th Test: तिसऱ्याचं दिवशी इंग्लंडचा विजय निश्चित झालेला; भारताने पराभव कसा टाळला? पाहा 5 मोठी कारणं!

आणखी वाचा

Comments are closed.