यशस्वी जयस्वाल ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; रचेल का इतिहास?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जाईल. या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा यशस्वी जयस्वालवर असतील. तिसऱ्या कसोटी सामन्यात जयस्वाल अपयशी ठरला होता, त्यामुळे आता चौथ्या कसोटीत त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच वेळी, यशस्वी जयस्वालला चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान विश्वविक्रम करण्याची संधी असेल.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 50 षटकार मारण्याचा विक्रम करण्याची जयस्वालकडे उत्तम संधी असेल. यासाठी जयस्वालला मोठी खेळी खेळावी लागेल आणि त्याच्या खेळीत त्याने 10 षटकारही मारले पाहिजेत. जयस्वालने आतापर्यंत 22 कसोटी सामन्यांच्या 42 डावात एकूण 40 षटकार मारले आहेत. जयस्वालला 50 षटकार पूर्ण करण्यासाठी आणखी 10 षटकार मारावे लागतील.
कसोटीत सर्वात जलद 50 षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 46 डावांमध्ये 50 षटकार पूर्ण केले. दरम्यान, जर जयस्वालला आफ्रिदीचा हा विश्वविक्रम मोडायचा असेल तर त्याला फक्त 45 डावात 50 षटकार पूर्ण करावे लागतील. म्हणजेच जयस्वालला मँचेस्टर कसोटीत दोन डाव खेळायला मिळतील. यानंतर, पाचव्या कसोटीत, जयस्वालकडे सर्वात जलद 50 षटकार मारण्याचा विश्वविक्रम मोडण्यासाठी एक डाव शिल्लक असेल. जयस्वालला फक्त 45 डावात सर्वात जलद 50 षटकार मारावे लागतील, तरच तो शाहिद आफ्रिदीचा हा विश्वविक्रम मोडू शकेल.
या मालिकेत आतापर्यंत, जयस्वालने 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावांमध्ये फलंदाजी करताना 233 धावा केल्या आहेत. जयस्वालने सुमारे 39 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या मालिकेत जयस्वालच्या बॅटमधून फक्त एकच षटकार मारण्यात आला आहे. आतापर्यंत जयस्वालने एक शतक झळकावले आहे. आता जयस्वाल ‘करो या मरो’ कसोटी सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे.
Comments are closed.