जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूंने घात केला, संजू सॅमसन IPL ला मुकणार?

टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन दीड महिने क्रिकेट पासून लांब राहणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पार पडलेल्या पाचव्या टी-20 सामन्यात फलंदाजी करत असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू तर्जनीला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सामना सुरू असताना तात्पुरते उपचार करण्यात आले होते. परंतु आता वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाचवा टी20 सामना पार पडला. टीम इंडियाने हा सामना जिंकला असून मालिका सुद्धा 4-1 अशा फरकाने जिंकली आहे. मात्र, या सामन्यात फलंदाजी करत असताना जोफ्रा आर्चरने टाकलेला वेगवाने चंडू तर्जनीला लागल्याने संजू सॅसमनला गंभीर दुखापत झाली होती. आता वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आला असून संजूची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संजूला जवळपास सहा आठवडे म्हणजेच दीड महिने क्रिकेट पासून लांब रहावे लागणार आहे. त्यामुळे संजू सॅसमन आयपीएलला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Comments are closed.