रूटचा शतक महोत्सव, सिराजने सामना फिरवला

इंग्लंडचा संकटमोचक आणि धावांच्या भुकेल्या जो रुटने ओव्हलच्या मैदानावरही आपला शतक महोत्सव सुरूच ठेवला. सलग तिसऱ्या कसोटीत शतक झळकवत रुटने 39 वे शतक साकराले आणि पुन्हा एकदा क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. कसोटी कारकीर्दीतील 39 व्या शतकासह रुटने श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या 38 शतकांना मागे टाकले. आता तो सर्वाधिक शतके साजरे करणाऱ्या शतकवीरांच्या पंक्तीत चौथ्या स्थानावर आहे.
रुटने आज आपले शतक केवळ 137 चेंडूंमध्ये पूर्ण केले. या शतकासह तो आता केवळ सचिन तेंडुलकर (51), जॅक्स पॅलिस (45) आणि रिकी पाँटिंग (41) यांच्या मागे आहे. त्याचा शतकांचा सुपर वेग पाहता तो वर्षभरात रिकी पॉण्टिंग आणि जॅक पॅलिसच्या शतकी आकडय़ांनाही मागे टाकू शकतो. त्याने लॉर्ड्स आणि मँचेस्टर पाठोपाठ ओव्हलमध्येही शतक पूर्ण करत आपली ‘शतक हॅटट्रिक’ साजरी केली.
सिराजने सामना करा फिरवला
इंग्लंडच्या 3 बाद 137 धावा झाल्या होत्या. मैदानात हॅरी ब्रुक स्थिर होण्याचा प्रयत्न करत होता. त्याने 19 धावा ठोकल्या होत्या. डावातील 35 वे षटक प्रसिध टाकत होता. पहिल्याच चेंडूवर ब्रुकने त्याला उंच फटका मारला जो थेट सिराजच्या हातात विसावला. झेल अत्यंत सोपा होता, आणि तो सीमारेषेच्या दोन फूट पुढे होता. पण सिराजकडून नकळत घोडचूक झाला आणि त्याच्या पायाने सीमारेषा ओलांडली. येथेच सामन्याने नाटय़मय वळण घेतले. यानंतर ब्रुक आणि रुटने हिंदुस्थानी गोलंदाजीला पह्डून काढत सामना इंग्लंडच्या बाजूने फिरवला. दोघांनीही खणखणीत शतके ठोकली.
Comments are closed.