…अन् गौतम गंभीर रडला; टीम इंडियाने सामना जिंकताच ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO
Ind vs ENG 5th व्या चाचणी: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ( (India Wins Oval Test) ) बाजी मारली. कसोटीच्या शेवटच्या दिवशी यजमान इंग्लंडला (India vs England 5th Test) सामना आणि मालिका विजयासाठी केवळ 35 धावांची, तर सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी भारताला चार विकेट्सची आवश्यकता असताना नाट्यमय खेळ रंगला. अखेर भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जोरावर अवघ्या 6 धावांनी भारताने थरारक विजय मिळवला. या विजयासह पाच कसोटी सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली.
शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज लढाई आणि वाढीसह भरलेल्या मालिकेवर प्रतिबिंबित करतात 💭#डब्ल्यूटीसी 27 #ENGVIND
अधिक 👇https://t.co/9ni1l0fmfz
– आयसीसी (@आयसीसी) 4 ऑगस्ट, 2025
भारताच्या या विजयानंतर सर्व खेळाडूंनी मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले. तसेच ओव्हल मैदानात भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी एक फेरी मारत प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले. यादरम्यान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) इतर प्रशिक्षकांनी देखील सामना जिंकताच ड्रेसिंग रुममध्ये सेलिब्रेशन सुरु केले. गौतम गंभीर यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. याआधी गौतम गंभीरचं असं सेलिब्रेशन कधीच पाहिले नसेल. बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये भारताने सामना जिंकताच ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?, हे या व्हिडीओद्वारे दिसून येत आहे.
𝗕𝗲𝗹𝗶𝗲𝗳. 𝗔𝗻𝘁𝗶𝗰𝗶𝗽𝗮𝘁𝗶𝗼𝗻. 𝗝𝘂𝗯𝗶𝗹𝗮𝘁𝗶𝗼𝗻!
कच्च्या भावना सरळ नंतर #Teamindiaकेनिंग्टन ओव्हल येथे विशेष विजय 🔝#ENGVIND pic.twitter.com/vhrfv8ditl
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 4 ऑगस्ट, 2025
पाचवा कसोटी सामना कसा राहिला?
पहिल्या डावात भारताने 224 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला आणि इंग्लिश संघाने 23 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या आणि एकूण 373 धावांची आघाडी घेतली आणि 374 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा दुसरा डाव 367 धावांवर संपला. जो रूटच्या 105 धावा आणि हॅरी ब्रूकच्या 111 धावा इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. सिराजने शेवटच्या विकेट म्हणून यॉर्करने अॅटकिन्सनला त्रिफळाचीत केले. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर मालिकावीर म्हणून शुभमन गिल आणि हॅरी ब्रुकला निवडण्यात आले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.