तिसऱ्या दिवशी जैस्वाल-आकाशदीप-जडेजा-सुंदर चमकले, आता टीम इंडियाची मदार गोलंदाजांच्या हाती

इंग्लंड वि भारत 5 वा चाचणी 3 व्या दिवसाच्या स्टंप Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात केनिंग्टन ओव्हलवर सुरु असलेली पाचवी कसोटी सध्या रोमांचक वळणावर पोहोचली आहे. पावसाने व्यत्यय आणला नाही, तर सामना निर्णायक लागण्याची पूर्ण शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, भारताने इंग्लंडपुढे 374 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसअखेरपर्यंत 1 गडी गमावून 50 धावा केल्या आहेत. बेन डकेट 34 धावांवर नाबाद आहे, तर झॅक क्रॉली 14 धावांवर माघारी परतला. आता इंग्लंडला विजयासाठी अजून 324 धावांची गरज आहे आणि भारताला 9 गडी बाद करायचे आहेत. त्यामुळे आता भारताची मदार पूर्णपणे गोलंदाजांवर आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

आणखी वाचा

Comments are closed.