‘विराट, देशाला तुझी गरज….’ ब्रुक-रुटकडून टीम इंडियाची धुलाई सुरु असताना कोहलीला कुणी घातली सा

विराट कोहलीवर शशी थरूर: ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 6 विकेट गमावून 339 धावा केल्या आहेत. खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला, त्यानंतर पावसाने भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सततच्या पावसामुळे खेळ वेळेपूर्वीच घोषित करण्यात आला. जेमी स्मिथ सध्या 2 धावा काढून खेळत आहे, तर जेमी ओव्हरटनला खातेही उघडता आलेले नाही. इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे आणि भारताला 4 विकेटची आवश्यकता आहे.

यादरम्यान, अखेरच्या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता कमी असतानाच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विराट कोहलीची आठवण झाली. त्यांनी भावनिक संदेशातून विराट कोहलीला पुन्हा कसोटीत परतण्याचं आवाहन केलं आहे.

शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “या मालिकेतील अनेक क्षणी मला विराट कोहलीची कमतरता जाणवत होती, त्याचं धैर्य, जोश, मैदानावरची प्रेरणादायक उपस्थिती आणि फलंदाजीतील जादू कदाचित हा सामना वेगळ्या मार्गाने गेला असता. अजून वेळ गेलेली नाही का? विराट, देशाला तुझी गरज आहे.”

विराट कोहलीने मे महिन्यात घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

12 मे 2025 रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून म्हटलं होतं, “ही फॉर्मट माझ्यासाठी नेहमीच खास राहिली आहे. अनेक तासांची मेहनत, हजारो क्षण जे कोणी पाहिले नाहीत पण कायम मनात राहिले… हे सर्व माझं आयुष्य बनलं. आता या फॉर्मॅटपासून दूर जातोय, हे सोपं नाही, पण योग्य वाटतंय. मी सगळं काही दिलं, आणि या खेळाने मला त्याच्या पलिकडचं दिलं. मी कृतज्ञ मनाने निरोप घेतो.”

विराटच्या पुनरागमनासाठी देशभरातून आवाज उठतोय

विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर संपूर्ण देशभरातून चाहत्यांकडून आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून त्याच्या पुनरागमनाची मागणी सातत्याने होत आहे. शशी थरूर यांचे हे भावनिक आवाहन लाखो भारतीयांची भावना व्यक्त करतंय, जे पुन्हा एकदा विराटला पांढऱ्या जर्सीत खेळताना पाहू इच्छितात.

इंग्लंड विजयाच्या दिशेने…

ओव्हलमध्ये सुरू असलेल्या या निर्णायक कसोटीत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स दुखापतीमुळे अनुपस्थित असतानाही भारताला संधी साधता आली नाही. मोहम्मद सिराजकडून मोठी चूक झाली, जेव्हा त्याने हॅरी ब्रूकचा झेल घेतला पण बाउंड्रीवर पाय लागल्याने झेल 6 धावांमध्ये बदलला आणि तो निर्णायक क्षण ठरला.

आणखी वाचा

Comments are closed.