मोठी बातमी! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघ भारत दाैरा करणार आहे. ज्यात दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. आयसीसीच्या या स्पर्धेपूर्वी टीम इंडियसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आज (18 जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडकर्ता आणि कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्राॅफी आणि वनडे संघाची घोषणा केली आहे.

टी20 मालिकेतील सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे खेळले जातील. तर एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होतील. ही टी20 मालिका 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. यानंतर एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. टी20 मालिकेतील सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील. तर एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहेत.

भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक

22 जानेवारी – पहिला टी20, कोलकाता (सायंकाळी 7 वाजता)
25 जानेवारी – दुसरा टी20, चेन्नई (सायंकाळी 7 वाजता)
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट (सायंकाळी 7 वाजता)
31 जानेवारी – चौथा टी20, पुणे (सायंकाळी 7 वाजता)
2 फेब्रुवारी – पाचवा टी20, मुंबई (सायंकाळी 7 वाजता)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

6 फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना, नागपूर (दुपारी 1.30 वाजता)
9 फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, कटक (दुपारी 1.30 वाजता)
12 फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद (दुपारी 1.30 वाजता)

इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधर), शुभमन गिल (कर्णधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ जैस्वाल, ऋषभ जैस्वाल, ऋषभ जैसवाल. , हर्षित राणा

हेही वाचा-

रोहित कर्णधार, गिल उपकर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा
या कारणांमुळे विराट कोहली, केएल राहुल नाही खेळणार रणजी ट्रॉफी, बीसीसीआय खपवून घेणार?
vinod kambli birthday special; विनोद कांबळीचा हा रेकाॅर्ड मोडणे अशक्य! जवळपासही कोणी नाही

Comments are closed.