IND vs ENG: अपयश आलं तरीही शुबमन गिलने केला मोठा विक्रम! ओव्हलवर केला ऐतिहासिक कारनामा

भारतीय संघाचा युवा टेस्ट कर्णधार चुंबन गिलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या फलंदाजीने कमाल केली आहे. गिलने या मालिकेत 4 शतके झळकावून धमाल उडवून दिली आहे. तिसऱ्या टेस्ट सामन्यात गिलला आपल्या फलंदाजीने फारसा प्रभाव टाकता आला नाही. अशाच प्रकारचा खेळ त्यांच्या या मालिकेतील शेवटच्या टेस्ट सामन्यातही पाहायला मिळाला. केनिंग्टन ओव्हलवरील दोन्ही डावांत अपयशी ठरल्यानंतरही कर्णधार शुबमन गिलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

टेस्ट कर्णधार शुबमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. गिलने टेस्ट क्रिकेटमध्ये 2647 धावा, तर वनडेमध्ये 2775 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 578 धावा जोडल्या आहेत. गिलने ओव्हल टेस्टच्या पहिल्या डावात 21 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात फक्त 11 धावाच करू शकला. तरीही त्याने हा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. गिलने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये एकूण 754 धावा केल्या आहेत. या मालिकेत गिलने 3 शतके आणि 1 द्विशतक झळकावले आहे. मात्र या दौऱ्यात त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. तरीही कर्णधार म्हणून गरज असताना त्याने स्वतःला फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे.

जर कर्णधार गिलने या डावात आणखी 21 धावा केल्या असत्या, तर ते दिग्गज सुनील गावसकर यांना मागे टाकू शकले असते. एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय विक्रम गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 774 धावा केल्या होत्या. तर गिल या मालिकेत 754 धावाच करू शकला. मात्र या मालिकेत कर्णधार गिलला सलामीवीर केएल राहुल, त्याचा जोडीदार फलंदाज यशस्वी जयस्वाल, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचं भरभरून साथ भेटली.

Comments are closed.