IND vs ENG: इंग्लंडच्या संघात नसतानाही फील्डिंगमध्ये दाखवला दम, जाणून घ्या कोण आहे नॅथन बार्नवेल?
एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2025 मध्ये दुखापती आणि वर्कलोड मुळे टीम इंडिया आणि इंग्लंड दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दोन्ही संघांचे महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे अखेरचा सामना खेळू शकत नाहीत. केनिंग्टन ओव्हल लंडन येथे तिसऱ्या दिवशी एक अतिशय विचित्र घटना पाहायला मिळाली. इंग्लंडकडून नाथन बार्नवेल नावाचा खेळाडू फिल्डिंग करताना दिसला. विशेष म्हणजे, हा खेळाडू इंग्लंडच्या अधिकृत संघातच नव्हता. मैदानावर त्याला पाहून सर्वच जण चकित झाले. त्यामुळेच सर्वजण या खेळाडूबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसले. अशा परिस्थितीत इंग्लंडचा कर्णधार ओली पोप ड्रेसिंग रूममध्ये हेड कोच ब्रेंडन मॅक्युलम यांची भेट घेण्यासाठी गेला. त्याच वेळी नाथन बार्नवेलला फील्डिंगसाठी मैदानात उतरावं लागलं. बार्नवेलला मैदानावर पाहून सगळेच चकित झाले. नाथन बार्नवेल काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सरे संघासाठी खेळताना दिसतो. या 22 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत सरेकडून 1 फर्स्ट क्लास सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 22 धावा करत 1 बळीही मिळवला होता. तसेच त्याने 8 लिस्ट ए सामन्यांमध्ये 88 धावा करत 2 विकेटही घेतल्या आहेत.
इंग्लंडच्या संघात क्रिस वोक्सच्या दुखापतीमुळे एका फील्डरला मैदानात उतरावे लागले. तर बेन स्टोक्स आधीपासूनच दुखापतीमुळे बाहेर आहे. अशा परिस्थितीत जेव्हा ओली पोप मैदानाबाहेर गेले, तेव्हा त्यांच्या संघाकडे फील्डिंगसाठी कोणताही खेळाडू उरला नव्हता. त्यामुळेच सरेकडून खेळणाऱ्या या युवा अष्टपैलू खेळाडूला मैदानावर उतरावं लागलं. ओव्हल हे सरे संघाचं होम ग्राउंड आहे. मात्र आता इंग्लंड संघ अजिबातच इच्छित नाही की त्यांचा आणखी एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होईल, कारण सध्याची परिस्थिती आधीच चिंताजनक वाटते आहे.
Comments are closed.