IND Vs ENG – पहिल्या धावेने रडवलं; विस्फोटक फलंदाज जेकब बेथेलच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा विस्फोटक सलामीवीर जेकब बेथेलच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी टिचून मारा करत पहिल्या चेंडूपासून जेकब बेथेला जागचं हलू दिलं नाही. त्याला पहिली धाव करण्यासाठी जवळपास 13 चेंडूंचा सामना करावा लागला. 13 व्या चेंडूवर त्याने आपलं खातं उघडलं आणि त्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

जेकब बेथेल संथ सुरुवातीमुळे तो वनडे क्रिकेटमध्ये आपले पहिले खाते उघडण्यासाठी सर्वाधिक चेंडू खेळणारा इंग्लंडचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी माजी कर्णधार सर अलिस्टर कुक असून, त्याने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 18 व्या चेंडूवर पहिले धाव घेतली होती. एजबेस्टनच्या मैदानावर इंग्लंडचा इतिहास अत्यंत मजबूत राहिला असून त्यांनी येथे खेळलेले सलग सात सामने जिंकले आहेत. या मैदानावर इंग्लंडला शेवटचा पराभव 2014 मध्ये हिंदस्थानकडूनच स्वीकारावा लागला होता, जेव्हा टीम इंडियाने त्यांचा ९ विकेट्सनी पराभव केला होता. तेव्हापासून इंग्लिश संघ येथे अपराजित आहे. याशिवाय, इंग्लंडचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याच्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा बटलरचा 200 वा वनडे सामना असून, इंग्लंडसाठी 200 वनडे सामने खेळणारा तो केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे.

सामन्याचा विचार करता, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या 80 या धावसंख्येवर त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला होता. मात्र, जो रूट आणि लियाम डॉसन यांनी मधल्या फळीत डाव सावरला आणि धावसंख्येला 200 पार नेलं. दोघांनी अर्धशतके पूर्ण केली असून संघाला पुन्हा एकदा मजबूत स्थितीत आणलं आहे. 43 षटकांचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात 223 धावांपर्यंत मजल मारली आहे. तर जो रूट (58) आणि लियाम डॉसन (66) हे दोघेही नाबाद फलंदाजी करत आहे. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत, तर जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.

Comments are closed.