आई रुग्णालयात… तरीही गौतम गंभीर इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपल्या समर्पणाची एक वेगळीच मिसाल जगासमोर मांडली आहे. काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर इंग्लंडहून त्याच्या आईची तब्यत खराब असल्याने भारतात परतला होता, पण आता सध्या त्यांच्या आईंची तब्येत स्थिर असली, तरी त्या अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा कठीण प्रसंगीसुद्धा गंभीरने देशासाठी आपले कर्तव्य प्राधान्य देत इंग्लंड दौऱ्यावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला लवकरच सुरुवात होणार असून, गंभीर भारतीय संघाच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. प्रशिक्षक म्हणून त्याच्या अनुभवाचा संघाला मोठा फायदा होणार आहे. कठीण कौटुंबिक परिस्थिती असूनही त्याने मैदानावर परतण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच प्रेरणादायी आहे.

गाैतम गंभीरसाठी ही मालिका खूप अवघड जाणार आहे. कारण रोहित विराट च्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा पहिलाच विदेश दाैरा आहे. शिवाय या दाैऱ्यावर मोठ्या प्रमाणात युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर कर्णधार पद शुबमन गिलकडे आहे. आता गिल-गंभीरची जोडी कशी कामगिरी करते हे पाहणे रंजक असेल.

भारताचा इंग्लंड दौरा (5 कसोटी सामने)

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड, पहिली कसोटी: 20-24 जून 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी कसोटी: 2-6  जुलै 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025
भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवी कसोटी: 31-04 ऑगस्ट 2025

Comments are closed.