IND Vs ENG- लॉर्ड्सवर बुमरासह अर्शदीपही दिसणार? अपयशी प्रसिध-नितीशला वगळण्याची शक्यता

हिंदुस्थानचा नवकर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने हिंदुस्थानला मालिकेत बरोबरी साधणारे यश मिळवून दिलेय. या यशाने अवघ्या हिंदुस्थानची छाती अभिमानाने फुगलीय. तसेच जसप्रीत बुमराशिवाय हिंदुस्थानी संघाचं काय होणार ही धाकधूकही संपलीय. त्यामुळे लॉर्ड्सवर तिरंगा फडकवण्यासाठी हिंदुस्थानी संघ काही बदलांसह उतरणार हे नक्कीच आहे. म्हणजेच बुमरासह अर्शदीप सिंग हा ऐतिहासिक लॉर्ड्सवर पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. हिंदुस्थानी संघ या बदलाचा गंभीरपणे विचार करत असल्याचेही निदर्शनास आलेय.
पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी संघ पराभूत झाला होता आणि बुमरावर गोलंदाजीचा अधिक ताण येऊ नये म्हणून संघात तीन बदल करण्यात आले होते. हे बदल हिंदुस्थानी संघासाठी कितपत यशस्वी ठरले याचा हिशेब मांडायलाही सुरुवात झालीय. त्यामुळे विजयानंतरही लॉर्ड्स कसोटीत किमान तीन बदल अपेक्षित आहेत. या बदलामुळे किमान आणखी एका खेळाडूला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. तो खेळाडू फलंदाज असेल की गोलंदाज हे सांगणे तूर्तास कठीण आहे.
ईश्वरनला पदार्पणाची संधी
पहिल्या कसोटीत साई सुदर्शन आणि करुण नायर दोघांना संधी मिळाली; पण दोघेही अपयशी ठरल्यामुळे सुदर्शनची गच्छंती झाली आणि नायरला आणखी एक संधी मिळाली. दुसऱया कसोटीतही नायर विशेष काही करू शकला नाही. त्यामुळे लॉर्ड्सवर त्याऐवजी रांगेत असलेल्या अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकते.
संभाव्य हिंदुस्थानी संघ
यशसवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन/करुन नायर/अभिमणू ईश्वरन, शुबमन गिल, रशाभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्डुल ठाकूर, आकाश दीप, जसप्रीत बर्मा.
लॉर्ड्स म्हणजे वेगवान गोलंदाजांचे नंदनवन
लॉर्ड्सची खेळपट्टी म्हणजे सिम आणि स्विंगला मदत करणारी खेळपट्टी. ही खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन ठरलीय. त्यामुळे लॉर्ड्सवर हिंदुस्थानी संघ चार वेगवान गोलंदाजांसह उतरणार हे सांगायला गंभीर होण्याची गरज नाहीय. याचाच अर्थ, एजबॅस्टनला खेळलेल्या दोन वेगवान गोलंदाजांना संघाबाहेर जावे लागणार आहे. त्यात पहिले नाव प्रसिध कृष्णाचे असेल आणि दुसरे नाव नितीश कुमार रेड्डीचे. या दोघांनाही आपला जराही प्रभाव पाडता आलेला नाही. प्रसिधने 27 षटकांत 111 धावा देत केवळ 1 विकेट टिपला, तर अष्टपैलू म्हणून संघात आलेल्या नितीशला केवळ 6 षटकेच गोलंदाजी करता आली. दुसऱया डावात तर त्याला गोलंदाजीच देण्यात आली नाही. फलंदाजीतही दोन्ही डावांत तो 1 आणि 1 अशा 2 धावा करू शकला. त्यामुळे त्याचेही संघातील स्थान डळमळीत झालेय. लॉर्ड्सवर एकाच फिरकी गोलंदाजाची गरज असल्यामुळे वॉशिंग्टन सुंदरलाही विश्रांती दिली तरी आश्चर्य वाटणार नाही. पण वॉशिंग्टनच्या जागी शार्दुलला खेळवायचे की कुलदीप यादवला घेण्याचा जुगार खेळायचा याबाबत संघ व्यवस्थापन विचार करतेय. पण लॉर्ड्सवर चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीवीर असणार हे नक्कीय. त्यामुळे अष्टपैलू म्हणून फिरकीवीराला संधी द्यायची की वेगवान गोलंदाजाला खेळवायचे या प्रश्नाचे उत्तर कसोटीपूर्वीच मिळू शकेल.
Comments are closed.