IND vs ENG: टीम इंडियाचा दणदणीत विजय, इंग्लंडचा व्हाईट वाॅश, गिल-विराट चमकले

भारताने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 142 धावांनी शानदार विजय मिळवत मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केला. या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही दमदार कामगिरी केली. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली यांनी फलंदाजीत चमकदार प्रदर्शन केले, तर गोलंदाजांनीही इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धचा एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय नोंदवला.

पहिल्या डावात खेळताना भारताची सुरुवात खराब झाली, कारण कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 1 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. गिलने अप्रतिम फलंदाजी करत 112 धावांची शतकी खेळी केली. विराट कोहलीनेही 52 धावा करत फॉर्मात पुनरागमन केले. श्रेयस अय्यरने 78 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर केएल राहुलने 40 धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेले. भारताने 50 षटकांत 356 धावांचा डोंगर उभा केला. गोलंदाजीत इंग्लंडकडून आदिल रशीदने 4 विकेट घेतल्या, मात्र त्याने 64 धावा दिल्या.

इंग्लंडच्या फलंदाजांना मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले. भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट घेत इंग्लंडला रोखले. परिणामी 45.3 षटकात 214 धावांत सर्वबाद झाला. भारताने 142 धावांनी मोठा विजय मिळवला. इंग्लंडकडून टॉम बँटन आणि गस अटिक्सनने सर्वाधिक 38-38  धावा केल्या. या विजयासह भारतीय संघाने मालिका 3-0 ने जिंकत दमदार कामगिरी केली.

हेही वाचा-

विराट कोहलीची मोठी कमाल! अर्धशतक झळकावून सचिनचे 2 विक्रम मोडले
शाहीन आफ्रिदीला राग अनावर, दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजाला अंगावर धावून दिली धमकी! VIDEO
IND vs ENG; शतक झळकावताच शुबमन गिलने इतिहास घडवला, भारताचा नवा स्टार..!

Comments are closed.