22 वर्षांचा 'कलंक' आज अखेर मिटणार? रोहित, विराट की गिल… कोण करणार इतिहास?
भारत विरुद्ध इंग्लंड IND VS ENG यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय ODI SERIES मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (रविवार, 19 जुलै) ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट Lords Cricket Ground मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना सहा गडी राखून जिंकत मालिकेत शानदार सुरुवात केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात जो रूटच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर इंग्लंडने पुनरागमन केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे, आजचा सामना मालिकेचा विजेता ठरवेल.
लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. फलंदाजांना, विशेषतः मैदानातील प्रसिद्ध उतारामुळे slope अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागतो. या परिस्थितीचा विचार करता, भारतीय फलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
लॉर्ड्सवर एकाही भारतीय फलंदाजाला एकदिवसीय शतकाची नोंद करता आलेली नाही
भारताने आतापर्यंत ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर एकूण नऊ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मैदानावर आजवर एकाही भारतीय फलंदाजाला एकदिवसीय शतकाची नोंद करता आलेली नाही.
या मैदानावर भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या 90 आहे, जी सौरव गांगुलीने 2004 मध्ये नोंदवली होती. त्यानंतरच्या 22 वर्षांत एकाही भारतीय फलंदाजाला हा विक्रम मोडता आलेला नाही.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात, भारताने 64 वेगवेगळ्या मैदानांवर किमान पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी लॉर्ड्स हे एकमेव असे मैदान आहे जिथे एकाही भारतीय फलंदाजाला एकदिवसीय शतक झळकावता आलेले नाही.
आजच्या निर्णायक सामन्यात भारतीय TEAM INDIA फलंदाजांकडे केवळ मालिका जिंकण्याचीच नाही, तर हा नकोसा वाटणारा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. याबाबतीत आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर सर्वात मोठी जबाबदारी असेल.
जरी रोहित शर्माला ROHIT SHARMA या मालिकेत अद्याप अपेक्षित लय सापडली नसली, तरी लॉर्ड्सवर मोठी खेळी करून टीकाकारांची तोंडे बंद करण्याची त्याच्याकडे उत्तम संधी आहे.
कार्डिफमध्ये 65 धावांची दमदार खेळी करत VIRAT KOHLI विराट कोहलीने फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे, आज त्याच्याकडून शतकाची अपेक्षा चाहत्यांकडून केली जात आहे.
दुसरीकडे, कर्णधार शुबमन गिलने SHUBMAN GILL पहिल्या एकदिवसीय सामन्यात 80 आणि दुसऱ्या सामन्यात 31 धावा केल्या होत्या. आज, मिळालेल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्याचे त्याचे ध्येय असेल.
लॉर्ड्सवर भारतीय फलंदाजांच्या सर्वोच्च धावा (एकदिवसीय सामने)
सौरव गांगुली – ९०
मोहम्मद कैफ – ८७*
सुरेश रैना – ८४
एम.एस. धोनी – ७८*
राहुल द्रविड – 73
Comments are closed.