'पिचवर गवत, आर्चर सज्ज', लाॅर्ड्स कसोटी भारतासाठी आव्हानात्मक, प्रशिक्षकाचा मोठा इशारा

भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितान्शू कोटक यांनी लॉर्ड्स कसोटीपूर्वी मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की या सामन्यासाठीची पिच मागील दोन कसोट्यांच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक असणार आहे. सध्या पिचवर बराच गवत आहे, जी सामन्याच्या पूर्वसंध्येला कमी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना कोटक म्हणाले, “जेव्हा पर्यंत आमचे फलंदाज अनावश्यक आक्रमक शॉट्स टाळतील, तोपर्यंत काही अडचण येणार नाही.” लॉर्ड्सच्या पिचवर सहसा कमी धावा होतात आणि त्यामुळे गोलंदाजांना परिस्थिती अधिक अनुकूल असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या सामन्यात भारतासाठी जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार आहे, तर इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चर तब्बल चार वर्षांनंतर कसोटीत परत येण्याची शक्यता आहे. आर्चरच्या पुनरागमनाबद्दल कोटक म्हणाले, “ही आमच्यासाठी एक मोठी आव्हानात्मक गोष्ट असेल. इंग्लंडच्या गोलंदाजी आघाडीत काही बदल दिसून येतील.” शिवाय ते भारतीय फलंदाजांचंही भरभरून कौतुक केलं. त्यांनी सांगितलं की, “शुबमन गिल, यशस्वी जायसवाल, लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांची शतकी कामगिरी भारतीय फलंदाजीचा कणा ठरत आहे.” विशेषतः गिलने दोन सामन्यांत तीन शतके ठोकत 585 धावा केल्या आहेत.

पुढे पंतच्या आक्रमक शैलीबद्दल कोटक म्हणाले, “पंतसारखा खेळाडू कोणत्याही साच्यात बसत नाही. तो सामना दरम्यान फार बोलत नाही, कारण त्याचा विश्वास आहे की त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो.”

कोटक यांनी स्पष्ट केलं की, “या पिचवर यश मिळवायचं असेल, तर तांत्रिकच नव्हे तर मानसिक दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. क्रीजवर अधिक वेळ घालवणं हे यशाचं गमक आहे.”

Comments are closed.