रोहित शर्मानंतर आता 'हा' खेळाडू बनणार टीम इंडियाचा पुढचा एकदिवसीय कर्णधार; माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
शुभमन गिलने कसोटी कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच मालिकेत टीम इंडियासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. कर्णधारपदासोबतच त्याने या मालिकेत बॅटनेही भरपूर धावा केल्या. यामुळेच गिलच्या कर्णधारपदाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने म्हटले आहे की शुभमन गिलला पुढे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिळेल.
मोहम्मद कैफने म्हटले आहे की गिलला एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही मिळेल कारण रोहित शर्मा किती काळ एकदिवसीय कर्णधार राहील हे आम्हाला माहित नाही. गिल कर्णधारपद स्वीकारण्यास पूर्णपणे तयार आहे. तो मर्यादित षटकांच्या स्वरूपात धावा करतो. त्याने कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे आणि संघाचे नेतृत्व आघाडीवरून केले आहे. जेव्हा तुम्ही तरुण संघासोबत खेळता तेव्हा तुम्हाला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला बॅटने धावा कराव्या लागतात, कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करावी लागते. एकूणच गिलसाठी हा एक उत्तम दौरा होता.
इंग्लंडमध्ये खेळलेल्या तरुण संघासोबतच्या कसोटी मालिकेत गिलने सर्वांना प्रभावित केले आहे, असे कैफचे मत आहे. कर्णधार म्हणून शुभमन गिलने या मालिकेत दोन्ही हातांनी संधींचा फायदा घेतला, असे त्याने म्हटले आहे. जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा त्याच्या कसोटी विक्रमाकडे पाहता त्याला कर्णधारपद का मिळाले याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. एक तरुण कर्णधार, तरुण संघासह, प्रचंड दबावाखाली इंग्लंड कसोटी मालिकेसाठी आला होता. त्याने फलंदाजीतून याचे उत्तर दिले आणि एक वेळ अशी आली की त्याची तुलना सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली गेली. या दौऱ्यात इंग्लंडचे गोलंदाज त्याच्यासमोर असहाय्य दिसत होते.
शुभमन गिलसाठी इंग्लंडचा दौरा फलंदाज म्हणूनही खूप चांगला राहिला आहे. त्याने पाच सामन्यांच्या १० डावात ७५.४ च्या सरासरीने 754 धावा केल्या. या दौऱ्यात त्याने द्विशतकासह एकूण 4 शतके केली. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने 269 धावांची शानदार खेळी केली. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
Comments are closed.