IND vs ENG: झेल घेण्याच्या नादात गिल-ब्रारची धडक! सुदैवाने टळला धक्कादायक प्रकार

टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात असून, पहिला सामना 14 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या 10 षटकांपर्यंत इंग्लंडने उत्कृष्ट खेळ करत एकही विकेट न गमावता 50 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र, क्षेत्ररक्षण करताना शुबमन गिल (Shubman gill & Gurnoor Brar) आणि गुरनूर ब्रार यांच्यात एक मोठा अपघात होता होता टळला. दोघांची ही एक चूक त्यांना महागात पडू शकली असती.

17 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh krishna) गोलंदाजी करत होता. त्यावेळी जोस बटलरने (Jos Buttler) मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या नीट संपर्कात आला नाही आणि हवेत उडाला. त्यावेळी मिड-ऑफला शुबमन गिल आणि मिड-ऑनला गुरनूर ब्रार क्षेत्ररक्षण करत होते. ब्रारने झेल घेण्यासाठी कॉल दिला, पण गिलला तो ऐकू आला नाही.

त्यामुळे, दोन्ही खेळाडू एकमेकांवर आदळले. सुदैवाने, ब्रारने झेल पूर्ण केला आणि दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. अनेकदा अशा धडकेत खेळाडूंना गंभीर दुखापत होऊ शकते, मात्र यावेळी तसे काही घडले नाही. यानंतर गिल आणि ब्रार हसू लागले, तर विराट कोहलीही त्यांना पाहून हसताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

17 व्या षटकापर्यंत इंग्लंडने आपले 5 मुख्य फलंदाज गमावले होते. विशेष म्हणजे, 12.1 षटकांपर्यंत इंग्लंडला एकही धक्का बसला नव्हता. सलामीवीर बेन डकेट (Ben Duccket & Jekab Bethel) आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतकी भागीदारी केली होती. डकेटने 43 धावा, तर बेथेलने 14 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी अत्यंत जोरदार कामगिरी करत शानदार गोलंदाजी केली.

Comments are closed.