चौथ्या कसोटीपूर्वी शुभमन गिलचं टेन्शन वाढणार? रिषभ पंतला खेळवू नका, रवी शास्त्रींचा सल्ला
मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया पिछाडीवर आहे. लीडस आणि लॉर्डस कसोटीत इंग्लंडनं भारतावर विजय मिळवत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं बर्मिंघम कसोटीत विजय मिळवला होता. आता मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथी कसोटी खेळवली जाणार आहे. ही कसोटी 23 जुलैपासून सुरु होणार आहे. या कसोटीत उपकर्णधार रिषभ पंत खेळणार की नाही याबाबत संशय कायम आहे. रिषभ पंत या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये असल्यानं भारताला तो न खेळल्यास मोठा धक्का ठरु शकतो. मात्र, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंतला चौथ्या म्हणजेच मँचेस्टर कसोटीत खेळवू नये असा सल्ला दिला आहे.
रिषभ पंत लॉर्डस कसोटीत दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंडच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहचा बॉल कलेक्ट करण्याच्या प्रयत्नात असताना बॉल उजव्या हाताच्या बोटाला लागलानं ते दुखापत ग्रस्त झालं होतं. यानंतर रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलनं विकेटकीपिंग केलं. तर, फलंदाजी रिषभ पंतनं केलं. रिषभ पंतनं लॉर्डस कसोटीत दोन्ही डावात फलंदाजी केली मात्र दुखापतीचा परिणाम दिसून आला होता. त्यामुळं रिषभ पंत मँचेस्टर कसोटीत खेळणार की नाही याबाबत चर्चा सुरु आहेत.
भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रिषभ पंतसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. शास्त्री यांनी भारतीय संघ व्यवस्थापन आणि शुभमन गिलला एक सल्ला दिला आहे तो म्हणजे रिषभ पंतला चौथ्या कसोटीत संघाबाहेर ठेवावं. रिषभ पंतला पूर्णपणे फिट झाल्यानंतर मैदानावर उतरवलं पाहिजे. स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देणं देखील धोकादायक ठरु शकतं असं शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्री यांनी ICC रिव्यूमध्ये संजना गणेशन सोबत बोलताना म्हटलं की जर रिषभ पंत याचं बोट तुटलं आहे किंवा फ्रॅक्चर असेल तर रिषभ पंतला विश्रांती देणं योग्य असेल. आता इंग्लंडला रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्याचं माहिती असल्यानं भारताला सब्स्टीट्यूट मिळणार नाही. जर रिषभ पंतला संघात स्थान दिल्यास त्याना विकेटकीपिंग आणि फलंदाजी करावी लागेल. फिटेनस पूर्ण नसताना कोणतंही एक काम करणं बरोबर नाही, असं शास्त्री म्हणाले.
रिषभ पंत विकेटकीपिंग करु शकत नसेल तर त्याला फलंदाज म्हणून संधी देऊ नये. जर त्यानं विकेटकीपिंग केलं नाही तर त्याला फील्डिंग करावी लागेल. त्यावेळी ग्लोव्ज नसल्यानं पुन्हा दुखापत झाल्यास परिस्थिती खराब होऊ शकते. विकेटकीपिंग करताना संरक्षण असतं. फील्डिंग करताना ते संरक्षण नसतं,त्यामुळं धोका वाढू शकतो, अशी भीती रवी शास्त्री यांनी व्यक्तकेली.
आणखी वाचा
Comments are closed.