INDvsENG: 6 सामन्यांत केवळ 80 धावा, तरीही इंग्लंडला ‘त्याची’ भीती! सॅम करनने दिले स्पष्टीकरण

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड असा रंगणार आहे. हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने मोठे विधान केले आहे. त्याने भारताच्या एका स्टार खेळाडूची भीती सध्या संघाला जाणवत असल्याचे वक्तव्य केले आहे.
बाद फेरीच्या या महत्वाच्या सामन्याआधी करनने भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा धोकादायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली आहे. त्याने म्हटले, “अभिषेकच्या खेळीचा अंदाज असून तो आमच्याविरुद्ध मोठी धमाकेदार खेळी न करण्याची इच्छा आहे.”
सध्या अभिषेकचा फॉर्म पाहता आणि करनचे विधान यावरून नक्कीच गोंधळ निर्माण झाला असेल. आता करनने अभिषेकबद्दल असे वक्तव्य काय केले असेल, हे जाणून घेऊ.
झाले असे की अभिषेकने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या टी२० सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने फेब्रुवारी २०२५मध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यावेळी त्याने ५४ चेंडूत १३ षटकार आणि ७ चौकार मारत १३५ धावा केल्या होत्या. तो सामना इंग्लंडने १५० धावांनी गमावला होता. हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वात मोठा पराभव होता. या सामन्याची महत्वाची बाब म्हणजे तो वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.
त्यामुळे करनने उपांत्य फेरीच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत म्हटले, “अभिषेकने पुन्हा तशी खेळी करु नये, अशी माझी आशा आहे. तसे आम्ही गुरूवारच्या सामन्यासाठी तयार आहोत.”
या स्पर्धेत अभिषेकची म्हणावी तशी कामगिरी झाली नाही. त्याने ६ डावांमध्ये ८० धावा केल्या आहेत. त्यामधील एक अर्धशतक जे त्याने झिम्बाब्वेविरुद्ध केले होते. तसेच तो या स्पर्धेच्या सुरूवातीच्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५ धावा आणि वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावा केल्या. असे असूनसुद्धा तो इंग्लंडसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण त्याच्या विस्फोटक खेळीने सामन्याचा निकाल पालटू शकतो.
Comments are closed.