Ind vs Eng: सिराजचा कहर! भारताचा 6 धावांनी जबरदस्त विजय!
ओव्हल टेस्टच्या शेवटच्या दिवशी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने 6 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 34 धावांची गरज होती, तर भारताला 4 विकेट्स लागायच्या होत्या. मोहम्मद सिराजने प्रथम जेमी स्मिथ आणि नंतर जेमी ओव्हर्टनला बाद करत भारताच्या विजयाची आशा निर्माण केली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने जोश टंगचा स्टंप उडवला. अखेरीस, सिराजने गस अॅटकिंसनला क्लीन बोल्ड करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. ही भारताची कामगिरी अनेक वर्षे लक्षात राहील. विशेष म्हणजे इंग्लंडसाठी क्रिस वोक्स देखील फलंदाजीसाठी मैदानात उतरले.
सिराजने दुसऱ्या डावात 30.1 षटकांत 104 धावा देत 5 बळी घेतले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात हॅरी ब्रूक आणि जो रूटने शतके ठोकत भारताच्या हातून सामना हिसकावून घेतला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भारताने जोरदार पुनरागमन केले. आकाश दीपने ब्रूकला बाद करत भारताला आशेचा किरण दाखवला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने बेथेलला बाद केले. दिवसाच्या अखेरीस प्रसिद्धने जो रूटलाही माघारी पाठवत भारताला मोठा दिलासा दिला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 98 चेंडूत 111 धावांची दमदार खेळी केली, तर जो रूटने 152 चेंडूत 105 धावा फटकावल्या. भारतासाठी सिराजशिवाय प्रसिद्ध कृष्णाने 4 आणि आकाश दीपने 1 विकेट घेतली.
यशस्वी जयस्वाल, केएल. राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज
जॅक क्रेली, बेन डकेट, ओली पोप (केर्नधार), जे रूटीन आहे, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेकब बेथेल, जेमीथ (येन्टी गार्ड), ख्रिस वॉक्स, ख्रिस येथे ख्रिस
Comments are closed.