शुभमन गिलचा मैदानाबाहेरही बोलबाला! लिलावात जर्सीला सर्वाधिक 5.41 लाखांची बोली

अ‍ॅण्डरस-तेंडुलकर करंडकात टीम इंडियाचा तरुण तडफदार कर्णधार शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली होती. अनेक विक्रम त्याने मोडित काढले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्याच्या नेतृत्वात संघाचा खेळ सुद्धा चांगला राहिला आणि मालिका बरोबरीत सुटली. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. पण यावेळी चर्चेच कारण ठरलीये त्याची जर्सी, जी त्याने कसोटी मालिकेत परिधान केली होती. त्याने स्वाक्षरी केलेल्या या जर्सीला 5.41 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लागली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार एंड्रयू स्ट्रॉसची पत्नी रुथ स्ट्रॉस यांच्या स्मरणार्थ दरवर्षी लॉर्ड्स टेस्टमधील एक दिवस “रेड फॉर रुथ फाउंडेशन”ला समर्पित केला जातो. रुथ स्ट्रॉस यांचे कॅन्सरमुळे निधल झालं होतं. याच फाउंडेशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात शुभमन गिलसह काही खेळाडूंच्या जर्सीचा लिलाव करण्यात आला. या लिलावात शुभमन गिलची जर्सी सर्वाधिक 5.41 लाख रुपयांमध्ये विकली गेली. शुभमन गिल व्यतिरिक्त या लिलावामध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंनी स्वाक्षरी केलेल्या जर्सी, टोप्या, छायाचित्रे आणि बॅट यांचा समावेश होता.

संजूचा राजस्थान रॉयल्सला लवकरच रामराम, आकाश चोप्राचा खळबळजनक दावा

या लिलावामध्ये जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांची जर्सी 4,200 पाउंड म्हणजे जवळपास 4.94 लाख रुपयांचा विकली गेली. त्यानंतर केएल राहुलची जर्सी 4,000 पाउंड म्हणजेच जवळपास 4.70 लाख रुपयांना विकली गेली. टीम इंडियाच्या खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंडच्या संघातून जो रूटची स्वाक्षरी असलेली जर्सी 3,800 पाउंड म्हणजेच 4.47 लाख रुपयांना, बेन स्टोक्सची जर्सी 3,400 पाउंड म्हणजेच 4 लाख रुपयांना विकली गेली. तसेच जो रुटची स्वाक्षरी असलेली टोपी 3,000 पाउंड म्हणजे 3.52 लाख रुपयांना विकली गेली, ऋषभ पंतची टोपी 1,500 पाउंड म्हणजेच 1.76 लाख रुपयांना विकली गेली.

Comments are closed.