IND vs ENG: पहिल्या टी20 मध्ये शमीला संधी का मिळाली नाही? पुन्हा फिटनेसवर प्रश्नचिन्ह
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी20 सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला.ज्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना 7 विकेट्स आणि 43 चेंडू शिल्लक असताना जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2022 नंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण त्याला पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्याच्या व्यतिरिक्त, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांनाही भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यानंतर तो स्थानिक क्रिकेटमध्ये परतला. ज्यात त्याने विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी चांगली कामगिरी केली. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी जेव्हा संघाने सराव सत्रात भाग घेतला. तेव्हा शमीने गुडघ्यावर पट्टी बांधून गोलंदाजी केली. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न असा आहे की तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही का? ज्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेले नाही. आता दुसऱ्या टी20 सामन्यात तो पुनरागमन करू शकतो अशी शक्यता आहे. पण याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आले नाही. त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 24 विकेट्स घेतल्या आहेत.
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की आम्ही गोलंदाजी करू. विकेट थोडी चिकट दिसत आहे. नंतर दव पडेल. या मालिकेकडे पाहता, तयारी चांगली झाली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्लेइंग इलेव्हनची निवड करणे ही डोकेदुखी आहे. आपल्याला आपल्या ताकदींवर टिकून राहावे लागेल. मोहम्मद शमी, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा हे खेळाडू संघाबाहेर आहेत. मात्र, त्याने शमी न खेळण्याचे कोणतेही कारण दिले नाही. शमी 14 महिन्यांनंतर टीम इंडियात परतत आहे.
हेही वाचा-
IND VS ENG; अभिषेकची तुफानी तर चक्रवर्तीची शानदार कामगिरी, टीम इंडियाने बनवला खास विक्रम
अभिषेक शर्मानं इतिहास रचला, 18 वर्ष जुना ‘गुरु’ युवराज सिंगचाच महान रेकाॅर्ड मोडला
IND vs ENG; अभिषेक शर्माचे तुफानी अर्धशतक! भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा
Comments are closed.