आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VID
T20 WC 2026 इंड विरुद्ध नेड अभिषेक शर्मा: भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माच्या (Abhishek Sharma) नावावर एक अत्यंत नकोसा आणि लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या पहिल्याच तीन डावांमध्ये शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 18 फेब्रुवारी रोजी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही तो खाते उघडण्यापूर्वीच माघारी परतला. यापूर्वी यूएसए आणि पाकिस्तानविरुद्धही त्याला धावफलक एक पण धाव लावता आली नव्हती.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 WC 2026) अद्याप एकही धावा अभिषेक शर्माने केली नाही. नेदरलँड्सविरुद्ध अभिषेक शर्मा मोठी खेळी करेल, अशी सगळ्यांना आशा होती. परंतू नेदरलँडविरुद्धही अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा प्रचंड नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. याचदरम्यान भारत विरुद्ध नेदरलँड्सच्या सामन्याचे समालोचन करणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडूही अभिषेक शर्मा बाद होताच आश्चर्यचकीत झाले. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? (T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma, Video)
नेदरलँड्सविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी इशान किशन आणि अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. इशान किशनने विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष अभिषेक शर्माकडे होते. नेदरलँड्सकडून पहिल्याच षटकात फिरकीपटू आर्यन दत्त गोलंदाजीसाठी आला. यावेळी पहिले दोन चेंडूंवर अभिषेक शर्माला धाव घेता आली नाही. त्यानंतर पुढील चेंडूत अभिषेक शर्माला बाद करण्यात आर्यन दत्तला यश आले. अभिषेक शर्माला 3 चेंडूत एकही धाव करता आली नाही. अभिषेक शर्मा पुन्हा शून्यावर बाद होताच समालोचन करणारे इरफान पठाण, आकाश चोप्रा आणि हरभजन सिंगही नाराज झाले. अभिषेक शर्मा बाद होताच आकाश चोप्राने तोंडावर हात ठेवला. तर इरफान पठाण आणि हरभजन सिंगने माईक खाली ठेवत बघितलेही नाही.
द मॅन द मिथ अभिषेक शर्मा तुमच्यासाठी…#INDvsPAK #अभिषेक शर्मा #T20WorldCup pic.twitter.com/PQTUE8RkdK
— श्रावण सांगवान (@ByShravan) 19 फेब्रुवारी 2026
🚨 हिंदी समालोचकांची ही प्रतिक्रिया अभिषेक शर्माच्या विश्वचषक प्रवासाबद्दल सांगते! 🇮🇳🔥
3️⃣ सामने.
0️⃣ धावा.अजूनही या विश्वचषकात खाते उघडण्याची प्रतीक्षा आहे… संघर्ष खरा आहे! 💔🏏
इमेज क्रेडिट: जिओ हॉटस्टार#अभिषेक शर्मा pic.twitter.com/ZRkbgji6sC
— CricInformer (@CricInformer) 18 फेब्रुवारी 2026
भारताने नेदरलँड्सचा 17 धावांनी केला पराभव- (T20 WC 2026 Ind vs Ned)
टी-20 विश्वचषकात काल भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 17 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने साखळी फेरीत 4 पैकी 4 सामने जिंकून आपली अपराजित मोहीम दिमाखात सुरू ठेवली आहे. साखळी फेरीत अपराजित राहिल्यानंतर आता भारतीय संघ सुपर-8 फेरीसाठी सज्ज झाला आहे. भारताचा पुढचा मोठा सामना 22 फेब्रुवारीला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे हा हाय-व्होल्टेज सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता या लढतीकडे लागले आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.